सेक्स रॅकेट चालविणार्‍या दोन महिलांसह तिघांना अटक Pudhari File Photo
मुंबई

सेक्स रॅकेट चालविणार्‍या दोन महिलांसह तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलींना फुस लावून मुंबईत आणून सेक्स रॅकेट चालविणार्‍या दोन महिलांसह तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. ही टोळी अल्पवयीन मुलीच्या मदतीने हा सेक्स चालवत असल्याचे उघडकीस आले असून त्यांच्या तावडीतून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. या दोन्ही मुलींना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सबिना आफ्ताब मलिक, आफ्ताब उस्मान मलिक आणि मेहजबी निहाल शेख अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून अटकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन मुलींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालविणारी एक टोळी असून या टोळीचे काहीजण अल्पवयीन मुलींना घेऊन कुर्ला परिसरात येणार असल्याची माहिती युनिट पाचच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर व त्यांच्या पथकाने गुरुवारी कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी तिथे दोन महिलांसह तिघेही दोन अल्पवयीन मुलींना घेऊन आले होते.

या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत ते तिघेही अल्पवयीन मुलींच्या मदतीने शहरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांच्या तावडीतून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका केली. तपासात सबिना आणि आफ्ताब हे ठाण्यातील वाशिंद तर मेहजबी ही गोवंडी परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध भादवीसह पिटा व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT