The woman's life was saved despite coming under the local
सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकात पनवेलहून ठाण्याकडे जाणार्‍या लोकलखाली येऊन एका महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले.  Local File Photo
मुंबई

लोकलखाली येऊनही महिलेचे प्राण वाचले; दोन्ही पाय मात्र गेले

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे : सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकात पनवेलहून ठाण्याकडे जाणार्‍या लोकलखाली येऊन एका महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले. सुदैवाने तिचा जीव मात्र वाचला. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. लोकल फलाटाला लागत असतानाच रोहिणी बोटे या भोवळ येऊन पटरीवर पडली आणि लोकलची पहिली बोगी त्यांच्या अंगावरून गेली. त्या दोन्ही पटरीच्यामध्ये पडल्याने त्यांचे प्राण वाचले.

रविवार रात्रीपासूनच मुंबई, पनवेल व नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरु होता. त्यात कुर्ला येथे रुळांवर पाणी साचल्याने हार्बर रेल्वे पनवेल ते वाशीपर्यंतच सुरु होती. हजारो प्रवासी पनवेल ते वाशी स्टेशनवर लोकल सुरु होण्याची वाट पाहत होते. त्यात तळोजा येथे राहणार्‍या रोहिणी बोटे सीबीडीच्या तीन क्रमांच्या फलाटावर उभ्या असतानाच चक्कर येऊन रूळांवरच पडल्या.

त्याचक्षणी स्थानकात आलेल्या पनवेल-ठाणे लोकलच्या पहिल्या बोगीखाली त्यांचे पाय सापडले. हे सारे घडत असताना सर्वांच्याच काळजाचे ठोके चुकले. आता ही महिला वाचत नाही याची प्रत्येकालाच खात्री होती. प्रवाशांनी आरडा ओरडा केल्याने हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आला व त्याने लोकल मागे घेतली असता रोहिणी बोटे दोन्ही रुळाच्यामध्ये चक्क जीवंत होत्या. त्यांचे दोन्ही पाय लोकलच्या चाकाखाली आल्याने मात्र वेदनेने विव्हळत होत्या. त्यांना सीबीडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT