Jalgaon Hatnur Dam | पाणीपातळी वाढल्याने हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले

हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Hatnoor Dam
हतनूर धरणfile photo

जळगाव : हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा झाले असल्याने हतनुर धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास पुढील काही दिवसात अजून पाण्याची आवक चांगली असल्याने धरणांमधून 33867 क्युसेक पाण्याचा विसर्ग 14 गेटमधून सुरू करण्यात आला आहे.

Summary

पावसाचा जोर वाढल्यास हतनुरचे आणखी दरवाजे उघडणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर तापी नदीतून 19 हजार 105 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये होत असलेल्या पावसामुळे धरणात मुबलक प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे. ही आवक लक्षात घेता हतनूर धरणाचे सध्या 14 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. यामध्ये आठ दरवाजे दीड मीटरने व सहा दरवाजे एक मीटरने असे दरवाजे उघडण्यात आलेले असून यामधून 33867 क्युसेक पाण्याचा विसर्ग मंगळवार (दि.9) सकाळी चार वाजेपासून नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. मंगळवार (दि.9) रोजी रात्री एक वाजेला 14 दरवाजे एक मीटरने उघडे होते. मात्र पाण्याची आवक वाढल्यामुळे तीन तासानंतर सकाळी चार वाजेला आठ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन व हतनूर धरणाकडून व तापी नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी आपली गुरे जनावरे घेऊन नदीपात्राकडे जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत तापी नदीतून 19 हजार 105 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news