ठाणे बसणार मेट्रोत; हार्बरलाही मिळाली मेट्रो कनेक्टिव्हिटी pudhari photo
मुंबई

Thane metro 2 b mumbai: ठाणे बसणार मेट्रोत; हार्बरलाही मिळाली मेट्रो कनेक्टिव्हिटी, वेळापत्रक वाचा

metro 2 b mumbai metro line 9 mumbai:मेट्रो 2 ब आणि 9 चे आज लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 8 एप्रिल 2026 पासून सुधारित व अधिक प्रवासी-अनुकूल वेळापत्रक लागू केले आहे.

या अंतर्गत मेट्रो लाईन 9 (दहिसर पूर्व काशिगाव) आणि मेट्रो लाईन 2 ब (मंडाळे डायमंड गार्डन, टप्पा 1) या नवीन मार्गिका बुधवारपासून प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. त्यांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू झाली असून हार्बर लाईन परिसरालाही मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.

तसेच, मेट्रो लाईन 2अ आणि लाईन 7 या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार असून, लाईन 7 ही लाईन 9 सोबत एकत्रितपणे (इंटिग्रेटेड कॉरिडॉर) चालणार आहे, ज्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर (काशिगाव) दरम्यान थेट आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे.

  • मेट्रो लाईन 2 अ (पिवळी मार्गिका) अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व. मेट्रो 2 अ आता स्वतंत्र मार्गिका म्हणून कार्यरत राहील.

पहिली गाडी : सकाळी सुमारे 5:50- 5:55

शेवटची गाडी : रात्री सुमारे 10:35-11:00

वारंवारता : गर्दीच्या वेळेत : सुमारे 6 मिनिटे

इतर वेळेत : 8 ते 10 मिनिटे

एकूण फेऱ्या : आठवड्याचे दिवस : 289 / शनिवार 231 / रविवार : 213

  • मेट्रो लाईन 2 ब (टप्पा 1) महाराष्ट्र नगर मंडाळे ते देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान डायमंड गार्डन, चेंबूर मेट्रो 2 ब (टप्पा 1) मुळे हार्बर लाईन परिसराला मेट्रो जोडणी मिळाली आहे.

पहिली गाडी : सकाळी 6:00

शेवटची गाडी : रात्री सुमारे 10:15 10:30

वारंवारता : सुमारे 9 मिनिटे 30 सेकंद

एकूण फेऱ्या : 209

हा कॉरिडॉर चेंबूर आणि आसपासच्या भागांना अखंड मेट्रो सुविधा प्रदान करतो, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांसाठी नवीन प्रवास पर्याय उपलब्ध होतात.

  • मेट्रो 7 व 9 (संयुक्त कॉरिडॉर) गुंदवली ते काशिगाव लाईन 9 सुरू झाल्यानंतर लाईन 7 आता विस्तारित स्वरूपात कार्यरत राहील.

पहिली गाडी : सकाळी सुमारे 5:50

शेवटची गाडी : रात्री सुमारे 11:00

वारंवारता : गर्दीच्या वेळेत : सुमारे 5:50 मिनिटे/ इतर वेळेत 8 ते 10 मिनिटे

एकूण फेऱ्या : आठवड्याचे दिवस : 276/ शनिवार 223/ रविवार : 205

या एकत्रित मार्गिकेमुळे अंधेरी पूर्व ते काशिगाव दरम्यान थेट प्रवास शक्य होणार असून प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होईल.

महत्वाचे बदल

  • मेट्रो 9 व मेट्रो 2 ब 8 एप्रिलपासून सेवेत

  • मेट्रो 7 आता काशिगावपर्यंत विस्तारित मेट्रो 2 अ व 7 स्वतंत्र मार्गिका

  • प्रत्येक मार्गिकेवर वाढीव फेऱ्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT