Tejas Express file photo
मुंबई

Tejas Express: तेजस एक्स्प्रेस तब्बल 7 तास उशिरा; कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांचे हाल

सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल स्थानकांत गर्दीचा विस्फोट; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कोकणवासीयांची सर्वाधिक पसंती असलेली तेजस एक्स्प्रेस रविवारी तब्बल सात तास उशिरा सुटल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सीएसएमटी, दादर, ठाणे आणि पनवेल स्थानकांत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कोकणात जाण्यासाठी या स्थानकांवरून प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. अशावेळी गैरसोय झाल्यामुळे उन्हाळ्याच्या झळांमध्ये प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.

कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. होळी अन्‌‍ पाठोपाठ येणाऱ्या शिमग्यासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल आहेत. रेल्वेने होळी विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी त्याही अपुऱ्या पडत आहेत. असे असताना तेजस एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिरा सुटल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. इतर गाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे.

या गाडीला बोकडवाशांची सर्वाधिक पसंती असते. ही गाडी सकाळी 5.50 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटते. पण रविवारी ती दुपारी 12 वाजून 58 मिनिटांच्या सुमारास सुटली. तब्बल 7 तास उशिराने सुटल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तांत्रिक बिघाड आणि मार्गावरील कामामुळे गाडीला विलंब झाल्याचे सांगण्यात आले

तेजस एक्स्प्रेस 3 तासांपेक्षा जास्त उशिरा असेल, तर रेल्वेच्या नियमांनुसार प्रवासी टॅक्सी किंवा प्रवासाच्या विलंबासाठी अंशतः परताव्याचा दावा करू शकतात. ही सुविधा केवळ तेजस सारख्या प्रीमियम गाड्यांसाठी लागू असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT