IIM Mumbai Placement: आयआयएम मुंबई प्लेसमेंट 2024-26: 502 ऑफर्स; 71.4 लाखांचे सर्वोच्च पॅकेज

200+ कंपन्यांचा सहभाग; कन्सल्टिंग आघाडीवर, ॲमेझॉन-एचयूएल-मायक्रोसॉफ्टसह दिग्गजांची मोठी भरती
IIM Mumbai Placement
IIM Mumbai PlacementPudhari
Published on
Updated on

मुंबई : व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात आयआयएम मुंबईच्या 2024-2026 या बॅचसाठीच्या प्लेसमेंटच्या शेवटच्या हंगामात संस्थेतील विद्यार्थ्यांना तब्बल 502 नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या असून देशांतर्गत पातळीवर 71.4 लाख रुपयांचे सर्वोच्च वार्षिक पॅकेज मिळाले आहे. महिनाभर चाललेल्या या प्रक्रियेत विविध क्षेत्रांतील 200 हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता, अशी माहिती आयआयएमकडून देण्यात आली.

IIM Mumbai Placement
Hind Di Chadar: गुरु तेग बहादूरांच्या शहादतीचा संदेश मानवतेसाठी प्रेरणादायी – अमित शहा

एमबीए, एमबीए ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि एमबीए सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांतील एकूण 505 विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांनी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारत प्लेसमेंट प्रक्रियेतून माघार घेतली, तर उर्वरित विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून संधी मिळाल्या. अव्वल 10 टक्के विद्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज सरासरी 47.5 लाख रुपये, अव्वल 20 टक्के विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पॅकेज सरासरी

IIM Mumbai Placement
Middle East War: मध्यपूर्वेत युद्धाची धग : हजारो भारतीय आखातात अडकले, 350 हून अधिक उड्डाणे रद्द

41.4 लाख रुपये, तर अव्वल 50 टक्के विद्यार्थ्यांना सरासरी 34.5 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले. त्यामुळे आयआयएम मुंबईच्या विद्यार्थ्यांची उद्योगजगतातील मागणी वाढत असल्याचे दिसून आले. कन्सल्टिंग क्षेत्राने सर्वाधिक 123 ऑफर देत आघाडी घेतली. बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स (बीएफएसआय) क्षेत्रात तब्बल 33 टक्के वाढ नोंदली गेली.एफएमसीजी क्षेत्रात 24 टक्के वाढ, तर लॉजिस्टिक्स व सप्लाय चेन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाल्या आहेत.

IIM Mumbai Placement
Guru Tegh Bahadur: गुरु तेग बहादूरांच्या 350 व्या शहादत वर्षानिमित्त मोदींचा संदेश : सामाजिक ऐक्य आणि धर्मनिष्ठेचा पुनरुच्चार

माहिती तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा, हेल्थकेअर, प्रोडक्ट मॅनेजमेंट आणि सेल्स अँड मार्केटिंग अशा विविध कार्यक्षेत्रांत विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. अनेक नव्या कंपन्यांनी प्रथमच कॅम्पसला भेट दिली; तर ॲमेझॉन, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, मायक्रोसॉफ्ट आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या दिग्गज कंपन्यांकडून परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news