100 employees including 60 teachers were fired in 'Tees'
'टीस'मध्ये ६० शिक्षकांसह १०० कर्मचाऱ्यांना काढले file photo
मुंबई

'टीस'मध्ये ६० शिक्षकांसह १०० कर्मचाऱ्यांना काढले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : टाटा ट्रस्टकडून नेहमीप्रमाणे नीधीच न मिळाल्याने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची वेळ टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसवर (टीस) आली आहे. शुक्रवारी 'टीस'च्या व्यवस्थापनाने १०० कर्मचाऱ्यांच्या हाती नोकरीवरून काढून टाकणारी पत्रे ठेवली.

तुमची सेवा ३० जून रोजी संपुष्टात येत असून तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे नुतनीकरण करण्यात येणार नसल्याचे त्यात म्हटले आहे. टाटा एज्यूकेशन ट्रस्टकडून नियमित निधी मिळत राहिल्याने हे कर्मचारी गेली २००८ पासून 'टीस' मध्ये कार्यरत राहिले. त्यांनी वेगवेगळे अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्प राबवले. आणि आज अचानक बेकार होण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये ६० शिक्षक असून उर्वरित शिक्षकेतर कर्मचारी आहेत. गेले काही महिने आम्ही टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलत राहिलो, मात्र या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे काही मिळाले नाही. मागच्या महिन्याचा पगारही 'टीस'च्या राखीव निधीतून करण्यात आला. शेवटी या कर्मचाऱ्यांची नोकरी थांबवावी लागली असे 'टीस'च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

SCROLL FOR NEXT