Supriya Sule Social Media Post pudhari
मुंबई

Supriya Sule Social Media Post: प्रिय दादा, तुझी उणीव.... सुप्रिया सुळेंची सुचक पोस्ट; NCP (SP) चे नेमकं काय ठरलंय?

Anirudha Sankpal

Supriya Sule Social Media Post: दिल्लीतील संसंदेत परिसीमन विधेयक पुन्हा सादर करण्याच्या हालचाली सुरू आहे. यासाठी विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात आलं आहे. आधी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने परिसीमन विधेयकाला विरोध केला होता. त्या एनसीपीने आता या विधेयकाला पाठिंबा देणार असे सुतोवाच दिले आहेत. आज अजित पवार यांना जाऊन १० महिने पूर्ण होत आहेत. त्या अनुशंगाने हा फोटो शेअर करण्यात आल्याचं दिसतंय. मात्र या फोटोच्या टायमिंगबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

कोणती राजकीय डील झाली?

राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद आणि राज्यातील काही नेत्यांना राज्यात मंत्रीपद अशी डील झाल्याचे अनेक जाणकार सांगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज एक सुचक पोस्ट केली.

विशेष म्हणजे या फोटोत पवार कुटुंबाची पुढची फळी अर्थात जय पवार, पार्थ पवार, अभिमन्यु पवार आणि रोहित पवार देखील नाहीयेत.

सुप्रिया सुळेंची पोस्ट

सुप्रिया सुळे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहितात की, 'प्रिय दादा, तुझी उणीव संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक क्षणी जाणवत आहे. तुझ्यासोबत घालवलेले निखळ आनंदाचे क्षण कायम आमच्यासोबत आहेत. या आठवणी कायम आमच्या ह्रदयात राहतील'

रोहित पवार यांची देखील प्रतिक्रिया

इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता प्रिय दादा म्हणत ही पोस्ट केली आहे. त्यापूर्वी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला असल्याचे वक्तव्य करत हा पक्ष सत्तेशिवाय जगू शकत नाही अशी टोकाची टीका केली आहे. याचबरोबर वडेट्टीवार यांनी जर रोहित पवार काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागतच अशी प्रतिक्रिया दिली होती.

त्यानंतर रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर अजित पवार यांचा फोटो शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी अजून तपास झाला नाही असा सूर असून आपण दादांनी वेगळा निर्णय घेतला त्यावेळी देखील विचारांची बाजू सोडली नाही अन् आताही सोडणार नाही असं स्पष्ट केलं. त्यांनी एकप्रकारे पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेणार असल्याचे सुतोवाच दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT