supriya sule news  Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजाराचे पुरावे देईन; सुप्रिया सुळे यांचा इशारा

या निवडणुकीत घोडेबाजार इतक्या टोकाला जाईल, याची कल्पना नव्हती.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी कोणी काय केले, हे माहिती आहे. भाजपने आपल्याला तोंड उघडायला लावू नये; अन्यथा या निवडणुकीतील घोडेबाजाराचे पुरावे देईन, असा इशारा शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतून माघार घेतली. हा आघाडीतील नेत्यांचा सामूहिक निर्णय होता. परंतु, विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे, इतर आमिषे आणि दबावतंत्राचा वापर झाला. या निवडणुकीत घोडेबाजार इतक्या टोकाला जाईल, याची कल्पना नव्हती.

घोडेबाजार कसा झाला, याबाबत भाजपने आम्हाला बोलण्यास भाग पाडू नये, असेही सुळे म्हणाल्या. निवडणूक घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी आपण संसदेत विशेष विधेयक मांडणार आहोत. ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, पैशांचा गैरवापर थांबावा आणि तपास यंत्रणांची भीती दाखवून राजकीय दबाव टाकण्याच्या प्रकारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी हे विधेयक असेल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT