Sunetra Pawar News Pudhari
मुंबई

Sunetra Pawar News: ‘सोमेश्वर’चा विजय अजित पवार यांच्या कष्टाचे फळ; उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया

संचालक निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सुनेत्रा पवार यांचे स्वागत; शेतकऱ्यांना चांगला भाव आणि दुष्काळग्रस्तांना लवकर मदत मिळवून देण्याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याच्या संचालक निवडणुकीत प्रचंड यश मिळविल्याबद्दल मंगळवारी पक्ष कार्यालयात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

हा विजय म्हणजे दिवंगत अजित पवार यांच्या आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ आहे, अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षाचे मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, माझ्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकरी सुखी झाला पाहिजे, अशी अजित पवार यांची भावना होती.त्यांनी ३५ वर्षे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी कष्ट घेतले होते. यावर्षी देशातील उच्चांक भाव सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने दिला आहे. म्हणून तेथील शेतकरी सुखावह झाला होता.

अजित पवार यांच्या पाश्चात ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे यावेळी चुरशीची लढत होती. परंतु शेतकरी राजाला माहीत होतं की नेमकं काय करायचं आहे.

आज दादा नसले तरी त्यांनी हा विश्वास माझ्यावर दाखवला. हा विश्वास म्हणजे फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे याची मला जाणीव आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT