Sunetra Pawar DCM  Pudhari
मुंबई

Sunetra Pawar Politics: सुनेत्रा पवारांचा राज्यव्यापी दौरा तूर्तास नाहीच; राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

Sunetra Pawar Politics: सुनेत्रा पवारांची 'अजित दादा स्मृती यात्रा'; पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच राज्यभर फिरणार असल्याचे वृत्त होते.

Anirudha Sankpal

Sunetra Pawar News

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. नुकत्याच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याबाबत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे. सुनेत्रा पवार या पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार, या दौऱ्याला 'अजित दादा स्मृती यात्रा' असे नाव दिल्याचे वृत्त निराधार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांकडे

अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी पक्षाला पुन्हा उभे करणे आणि कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करणे हे सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

वृत्त काय होते?

अजित दादांच्या निधनानंतर राज्यभरातून जी हळहळ व्यक्त झाली, त्या भावनांची दखल घेत जनतेशी संवाद साधणे हा यासाठी सुनेत्रा पवार यात्रा काढणार असल्याचे वृत्त होते. मात्र, हे वृत्त निराधार असून सध्या असा कोणताही विचार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT