Sunetra Pawar : तुझे आणि माझे दु:ख सारखेच

स्व. विदीप जाधव यांच्या पत्नीचे सुनेत्राताई पवार यांच्याकडून सांत्वन
Sunetra Pawar
अजितदादा पवार यांचे अंगरक्षक विदिप जाधव यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, समवेत आ. सचिन पाटील, बाळासाहेब सोळस्कर, शिवरूपराजे खर्डेकर.
Published on
Updated on

तरडगाव : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी फलटण तालुक्यातील तरडगाव येथील दिवंगत पोलीस विशेष सुरक्षा अधिकारी विदीप दिलीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांना ‌‘तुझे आणि माझे दुःख सारखेच आहे‌’ म्हणत आयुष्यभर जाधव कुटुंबियांच्या सोबत राहीन, अशी ग्वाही दिली.

विदीप जाधव यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर ओढावलेल्या दुःखात सहभागी होत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आई, वडील, पत्नी, मुलं व नातेवाईकांशी संवाद साधला. दरम्यान, ‌‘राज्य सरकार आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले. विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांना कायमस्वरूपी नोकरीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. कर्तव्य बजावत असताना विदीप जाधव यांनी दाखवलेली निष्ठा, शौर्य आणि प्रामाणिक सेवा कायम स्मरणात राहील, असे सांगत सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, माझ्या पतीने अजित पवार यांना आयुष्यभर साथ दिली, तशीच आयुष्यभर साथ मला सुनेत्रा पवार देणार आहेत. आमच्या कुटुंबाकडे त्या कायम लक्ष देणार आहेत. अजित पवार यांनी कधीही माझ्या पतींना अंतर दिले नाही, असे स्व. विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव म्हणाल्या. यावेळी आ. सचिन पाटील, माजी आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरुपराजे खर्डेकर, सुरेंद्र घाडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news