मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इनकमिंगला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह विविध पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देत भाजपने मित्रपक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का दिला.
भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. मोहोळ तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार व सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर, माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा पार अजिंक्य राणा पाटील, प्रकाश चौरे, दीपक माळी, अस्लम चौधरी, भरत सुतकर, विक्रांत माने, सज्जन पाटील, जालिंदर लांडे, प्रमोद डाके, राजाभाऊ गुंड, यशोदा कांबळे, राहुल मोहोळ आदींसह अनेक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.