SSC Board Exam file photo
मुंबई

Board Exams Maharashtra: दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकारांवर कारवाई; 103 शिक्षक-कर्मचारी निलंबित

सीसीटीव्हीत सामूहिक कॉपी उघड; महाराष्ट्र राज्य मंडळाची कडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान यंदा सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने सामूहिक कॉपीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत तब्बल 103 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

बारावी परीक्षेत बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्रमांक 224) येथे सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. 10 फेब्रुवारी रोजी पहिल्याच पेपरदरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनाने 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय (केंद्र क्रमांक 79) येथेही मास कॉपीचा प्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करीत असल्याचे दिसून आल्याने 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांपैकी 21 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT