Mumbai Raj Bhavan SRPF Constable Death Pudhari
मुंबई

Mumbai SRPF Constable Death: मुंबईच्या राजभवनात खळबळ! SRPF जवानाने स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?

SRPF Constable Death: मुंबईतील राजभवन परिसरात सुरक्षा ड्युटीवर तैनात असलेल्या एसआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं.

पुढारी वृत्तसेवा

SRPF Constable Death: मुंबईतील मलबार हिल परिसरातील कडेकोट सुरक्षा असलेल्या लोकभवनात (राजभवन) सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. ड्युटीवर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. या प्रकरणाचा तपास मलबार हिल पोलीस करत आहेत.

मृत जवानाची ओळख कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे (वय 26) अशी सांगितली जात आहे. ते कोल्हापूर येथील SRPF ग्रुप 16 मध्ये कार्यरत होते आणि लोकभवन येथे सुरक्षा ड्युटीवर तैनात होते.

प्राथमिक माहितीनुसार, ड्युटीदरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस, वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले.

या प्रकरणात मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक, वैयक्तिक किंवा इतर कोणत्या कारणामुळे ही घटना घडली का, याचा तपास पोलीस करत आहेत. यासाठी सहकारी जवान आणि संबंधित व्यक्तींची चौकशीही सुरू आहे.

राजभवनासारख्या अतिसुरक्षित परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, तपासाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणामागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT