Crime Pudhari
मुंबई

Dadar Crime News: क्षुल्लक वादातून धक्कादायक घटना; मुलाकडून आईची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

दादरमध्ये कौटुंबिक वादातून मुलाने आईवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी दादर पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दादर येथे आईची मुलाकडून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रेझीना क्रुझ फर्नाडिस असे या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा मुलगा एडवर्ड क्रुझ फर्नाडिस याला दादर पोलिसांनी अटक केली आहे.

याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कौटुबिक वादातून एडवर्डने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहेत.

ही घटना सोमवारी रात्री उशिरा बारा वाजता दादर येथील भवानी शंकर रोड, गॅरेज गल्लीतील राम श्याम इमारतीच्या चवथ्या मजल्याावर घडली. सोमवारी रात्री उशिरा या दोघांमध्ये क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन प्रचंड वाद झाला होता.

या वादातून रागाच्या एडवर्ड याने त्याची आई रेझीना हिच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने भोसकले. दादर पोलिसांनी रक्तबंबाळ झालेल्या रेझीनाला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता. डॉ. एंजल जॉन्टो यांनी तिला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT