Siddhi Dalvi Para Swimming Pudhari
मुंबई

Siddhi Dalvi Para Swimming: दिव्यांग आणि पॅरा खेळाडूंसाठीची अनोखी 'स्नेह आशा'; सिद्धी दळवीची तीन पदकांची कमाई

१६,५०० हून अधिक विद्यार्थी, खेळाडूंना दिला आधार; आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्यासाठी केले प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विविध क्रीडा स्पर्धांमध्ये दिव्यांग आणि पॅरा खेळाडूंचा सहभाग वाढत आहे. या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात अनेक संस्था आणि फाउंडेशनचा मोठा वाटा असतो. मुंबईस्थित स्नेह आशा फाउंडेशन त्यापैकीच एक.

ना-नफा तत्त्वावर कार्य करणाऱ्या स्नेह आशा फाउंडेशनने आतापर्यंत १६,५०० हून अधिक विद्यार्थी आणि तरुणांपर्यंत पोहोचून त्यांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि पॅरा-क्रीडा कारकिर्दीला भक्कम पाठबळ दिले आहे.

२०२३ मध्ये सिद्धी चौहान जयस्वाल आणि स्नेहा जयस्वाल यांनी वंचित घटकांतील मुलांना व तरुणांना प्रगतीच्या समान संधी मिळाव्यात या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. मात्र, पारंपरिक शिक्षणापलीकडे जाऊन गुणवान दिव्यांग आणि पॅरा खेळाडूंना आर्थिक व तांत्रिक मदत करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्यासाठी फाउंडेशन विशेष प्रयत्न करत आहे.

कल्याण येथील १०० टक्के दृष्टिहीन पॅरा जलतरणपटू सिद्धी धीरेंद्र दळवी ही स्नेह आशा फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती उपक्रमाची एक लाभार्थी आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये भोपाळ येथे झालेल्या २६ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सिद्धीने ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये दोन सुवर्णपदके, तर १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये एक रौप्यपदक पटकावले.

यापूर्वी २०२४ आणि २०२५ च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने सुवर्णपदकांची कमाई केली होती. तिच्या उच्चस्तरीय प्रशिक्षणासोबतच तिचे शिक्षण आणि तंत्रज्ञान कौशल्य अबाधित राहण्यासाठी नोव्हेंबर २०२६ मध्ये भोपाळ येथे झालेल्या २६ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सिद्धीने ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये दोन सुवर्णपदके, तर १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये एक रौप्यपदक पटकावले.

यापूर्वी २०२४ आणि २०२५ च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने सुवर्णपदकांची कमाई केली होती. तिच्या उच्चस्तरीय प्रशिक्षणासोबतच तिचे शिक्षण आणि तंत्रज्ञान कौशल्य अबाधित राहावे यासाठी स्नेह आशा फाउंडेशनने तिला शिष्यवृत्ती आणि ऑनलाइन अभ्यासासाठी लॅपटॉप उपलब्ध करून दिला आहे.

सिद्धी दळवीने २०१७ मध्ये जलतरणाला सुरुवात केली. आतापर्यंत तिने जिल्हा, राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ४० सुवर्ण आणि ३ रौप्यपदके मिळवली आहेत. गेल्या वर्षी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदके पटकावली.

ती सध्या ठाणे येथील के. जी. जोशी कला महाविद्यालयात बीएमएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. अशाप्रकारे स्नेह आशा फाउंडेशन हे आर्थिक आणि शैक्षणिक पाठबळ देऊन अनेक होतकरू पॅरा खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बनवत आहे.

सिद्धीसारखे खेळाडू तयार व्हावेत: सिद्धी चौहान-जयस्वाल

स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापक सिद्धी चौहान जयस्वाल यांनी सिद्धी दळवीचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. २६व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेतील सिद्धी दळवीची कामगिरी स्नेह आशा फाउंडेशनमधील आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. तिची शिस्त, मेहनत आणि निर्भय वृत्ती तिच्या प्रत्येक कामगिरीतून दिसून येते. देशभरातील अनेक तरुण खेळाडूंसाठी ती प्रेरणादायी आहे, असे जयस्वाल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT