Siddhivinayak Temple Darshan Pudhari
मुंबई

Siddhivinayak Temple Darshan: अंगारकीसाठी सिद्धिविनायक मंदिर आज मध्यरात्रीपासून दर्शनासाठी खुले

Siddhivinayak Temple Angarki Darshan Timings: महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठीही स्वतंत्र व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात यंदाच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त विशेष तयारी करण्यात आली आहे. अंगारकीनिमित्त सोमवारनंतरच्या मध्यरात्री १.३० वाजल्यापासून दर्शनासाठी मंदिर खुले होणार असून, मंगळवारी दिवसभर येणाऱ्या भाविकांना गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र रांगा, प्रवेशद्वार तसेच दर्शनानंतर बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात मोठी गर्दी होत असल्याने भाविकांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी मंदिर न्यास आणि सुरक्षा यंत्रणांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांगा, मंडप व रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक, नवजात बालकांसह येणारे भाविक, दिव्यांग आणि गरोदर महिलांसाठीही स्वतंत्र रांग ठेवण्यात आली आहे. भाविकांनी दर्शनासाठी येताना कॅमेरा, लॅपटॉप यांसह कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत, असे आवाहन न्यासाने केले आहे.

भाविकांना गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपात मोफत चहा, पिण्याचे पाणी, मोबाइल टॉयलेट, पंखे, लाईट तसेच प्लाझ्मा/एलईडी टीव्हीवर श्रींचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मंदिर गाभारा आणि मंडप परिसरात वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार असून दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी एक कार्डियाक रुग्णवाहिका असेल. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, बॅगेज स्कॅनर, डीएफएमडी, एचएचएमडी आणि वॉकीटॉकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

अंगारकीच्या दिवशी रा.१.३० पासून दर्शन ते पहाटे ३.१५ असणार आहे. यानंतर पहाटे ३.३० वाजता आरती, दुपारी १२.१५ वाजता नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता धुपारती, रात्री ७.०५ ते ८.१० या वेळेत महापूजा आणि त्यानंतर महानैवेद्य व महाआरती होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT