Shivshakti Nagar Redevelopment Pudhari
मुंबई

Shivshakti Nagar Redevelopment: शिवशक्ती नगर पुनर्विकासावरून वाद; प्रलोभनांच्या बॅनरमुळे रहिवाशांमध्ये संभ्रम

विकासक मात्र स्वतः अदृश्य राहून बॅनरद्वारे रहिवाशांना लाखो रुपयांचे प्रलोभन देण्याचे काम करत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कुलाबा कफ परेड येथील शिवशक्ती नगर झोपडपट्टीचा पुनर्विकास सध्या हाती घेण्यात आला असून, एसआरएच्या माध्यमातून या परिसरातील घरांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

पण विकासक पुढे न येता बॅनरच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळी प्रलोभाने देऊन मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भूखंडावर डोळा ठेवून बसल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात कुलाब्यातील एका बड्या सत्ताधारी नेत्याचे नाव पुढे आले आहे. पण विकासक मात्र स्वतः अदृश्य राहून बॅनरद्वारे रहिवाशांना लाखो रुपयांचे प्रलोभन देण्याचे काम करत आहे.

बॅनर लावणाऱ्या विकासकाने आतापर्यंत एकही सभा न घातल्यामुळे सर्व रहिवासी संभ्रमात पडले आहेत. या बॅनरवर घरांच्या बदल्यात स्थानिकांना कुठे घर देणार हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आल आहे. मात्र त्याच जागी घर बांधून देण्याची मागणी स्थानिकांनी एसआरए प्रशासनाकडे केली आहे.तसेच समाजसेवक संतोष पवार यांनी बायोमेट्रिक सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केली आहे.

पुनर्विकासासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर सर्वसाधारण सभेचा ठराव, सभासदांचे मत, आवश्यक संमती व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असताना, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अपारदर्शक, मनमानी व सभासदांच्या कायदेशीर अधिकारांवर गदा आणणारी आहे.

याशिवाय, विकासकाची नियुक्ती कोणत्या प्रक्रियेद्वारे करण्यात आली, त्यासाठी सभासदांची मंजुरी आहे किंवा नाही, बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा उद्देश काय आहे, तसेच त्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेण्यात आली आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती सभासदांना देण्यात आलेली नाही.

आमच्या इथे ५ मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. शिवशक्ती नगर, सागर रहिवासी संघ ,गरीब जनता नगर ,महात्मा ज्योतिबा फुले नगर आणि ५ नंबर गरीब जनता नगर या ठिकाणी १२५० रहिवासी वास्तव्य करत आहेत. व्हेनिसको बिल्डर नवीन आहे. त्याने रहिवाशांबरोबर योग्य पद्धतीने एग्रीमेंट बनवलेले नाही.

आजपर्यंत कोणताही प्रकल्प उभारलेला नाही. त्या विकासकाकडे पैसा पण नाही. उद्या प्रकल्प विकून निघून गेला तर आम्हाला रस्त्यावर यावे लागेल, म्हणून आम्ही त्या विकासकासोबत जाणार नाही. आम्ही दुसऱ्या योग्य बिल्डरसोबत जाणार असल्याचे रहिवासी खालिद अन्सारी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT