शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.  Pudhari Photo
मुंबई

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण: सुनावणी पुन्हा लांबणीवर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार होती. मात्र खंडपीठासमोर असलेले पहिलेच प्रकरण दीर्घकाळ चालल्याने यावर सुनावणी होऊ शकली नाही. पुढील आठवड्यात १८ सप्टेंबरला या दोन्ही प्रकरणांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीसह शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात या दोन्ही आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी एकाच वेळी घ्यायची, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते. त्यानुसार दोन्ही प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुन्हा एकदा १० सप्टेंबर ही तारीखही देण्यात आली होती. मात्र यावेळीही सुनावणी होऊ शकली नाही.

दरम्यान, यापूर्वीही या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. पुढच्या काही काळात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार का, याबद्दल आता राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क सुरू झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT