शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीला मुहूर्त नाही!

पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर
Shivsena MLA Disqualification Case
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुप्रीम कोर्टाने लांबणीवर टाकली आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी (दि.21) सर्वोच्च न्यायालयात पार पडणार होती. ही सुनावणी पर्यायी खंडपीठासमोर होणार होती. मात्र घटनापीठाच्या नियमित सुनावण्या आणि कामकाजामुळे पर्यायी खंडपीठासमोरील सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

Shivsena MLA Disqualification Case
Shiv Sena MLA disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

पुढची सुनावणी कधी?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर पुढची सुनावणी कधी असेल याबाबत अद्याप सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात तारीख दर्शवण्यात आली नाही. ही तारीख आगामी दोन-तीन दिवसांमध्ये कळू शकेल. मात्र या प्रकरणाची सुनावणी आता थेट सप्टेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागेल का याबद्दल आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news