मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या ९० टक्के पेक्षा जास्त माजी नगरसेवकांना पुन्हा महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे. तसे स्पष्ट संकेत प्रत्येक माजी नगरसेवकाला मिळाले आहे. ज्या माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षणांमध्ये गेले असतील, त्यांना आजूबाजूच्या प्रभागांमध्ये उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)या पक्षातून शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये २०१७मध्ये निवडून आलेले ४ डझनपेक्षा जास्त माजी नगरसेवक दाखल झाले आहेत. या माजी नगर सेवकांना पुन्हा उमेदवारी देण्याचे वचन देऊनच त्यांना पक्षात सामावून घेण्यात आले होते. त्यामुळे यातील ९० टक्के पेक्षा जास्त माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे.
ज्यांचे प्रभाग आरक्षणामध्ये गेले असतील त्यांना आजूबाजूच्या प्रभागात उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर ज्यांचे प्रभाग महिला आरक्षणात असतील अशा माजी नगरसेवकांच्या पत्नीला अथवा मुलीला उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपा-शिवसेना प्रभाग वाटपामध्ये ज्या प्रभागात शिंदेचे माजी नगरसेवक असतील, ते प्रभाग शिदेंकडेच राहणार आहेत. असे महायुतीच्या प्राथमिक चर्चेत ठरले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये प्रभाग गमावण्याची शिंदेच्या माजी नगरसेवकांना भीती नाही. त्याशिवाय शिंदेंना शिवसेना ठाकरे गटातकडे असलेले काही प्रभागही सोडले जाणार आहेत. त्यामुळे शिंदेंच्या वाट्याला ७५ ते ८० प्रभाग येण्याची शक्यता आहे. तर भाजपा स्वतःकडे १४७ ते १५२ प्रभाग ठेवण्याची शक्यता आहे. मातून राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआयला काही प्रभाग सोडले जाण्याची शक्यता आहे.
शिंदे गट ठाकरेंच्या माजी नगरसेवकांच्या संपर्कात
शिंदेंकडे आलेले माजी नगरसेवकांचे प्रभाग वगळता अन्य प्रभागांमध्ये उंदीर कड़े सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांशी संपर्क साधला जात आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेले ठाकरे गटाचे माजी नगरसेवकही शिंदे गटातील नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते.