Sharad Pawar Not Invited For New Mumbai Airport Inauguration :
पंतप्रधानांच्या हस्ते आज (दि. ८ ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती असणार आहे. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते शरद पवार हे मात्र या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत. शरद पवारांच्या कार्यालयानेच याबाबतची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाचं निमंत्रणच आलेलं नाही असं शरद पवार यांच्या कार्यालयकडून सांगण्यात आलं आहे. याबाबत पुढारी न्यूजचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहेत आणि त्यातलं महत्त्वाचं जे काम असणार आहे ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन जे पंतप्रधान मोदींच्या हस्ते काही वेळातच होणार आहे आणि त्या कार्यक्रमाच निमंत्रण जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेलं नसल्याच आपल्याला समजतय खरंतर ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर राज्यसभेचे ज्येष्ठ खासदार देखील आहेत तरीही त्यांना या कार्यक्रमाच निमंत्रण आलेलं नाही आणि त्यामुळे शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार नाहीत अशी देखील माहिती मिळते'
पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींनी सांगिल्याप्रमाणं, प्रामुख्याने पाहायला गेलं तर विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना अस अशा पद्धतीने निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही फक्त सत्ताधारी जे नेते मंडळी तेच या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते मात्र शरद पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न आल्यामुळे ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत.
याचबरोबर आज पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो ३ चा लोकार्पण सोहळा देखील होत आहे. या कार्यक्रमाला अरविंद सावंत यांना निमंत्रण आहे मात्र तरी देखील ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असं कळतंय. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचं स्थानिक खासदार आहेत. मात्र निमंत्रण पत्रिकेवर त्यांच नाव नाहीये त्यामुळं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीयेत असं कळतंय.