Shaina NC Photo Controversy pudhari photo
मुंबई

Shaina NC Photo Controversy : शायना एन. सी. यांच्या कृतीवरून राजकीय वाद; शिंदे म्हणाले, ‘तो फोटो बाळासाहेबांचा नव्हता’

बाळासाहेब हे आमचे दैवत असून, त्यांचा अपमान कोणताही शिवसैनिक करू शकत नाही, असेही शिंदे म्हणाले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या आरोपावरून वाद निर्माण झाला असताना उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शायना एन. सी. यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला नसून, मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे, असा खुलासा केला.

बाळासाहेब हे आमचे दैवत असून, त्यांचा अपमान कोणताही शिवसैनिक करू शकत नाही, असे ते म्हणाले. शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा मणिशंकर अय्यर यांना चप्पल मारतानाचा तो फोटो होता. मी स्वतः तो फोटो पाहिला आहे. जो फोटो फाटला, त्यात मणिशंकर अय्यर यांचे तोंड फाटले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा अपमान झालेला नाही.

ठाकरे गटावर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, लोकांनी त्यांना नाकारले आहे. त्यामुळे खोटे आरोप करून बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फोटोवरून राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्यावर लक्ष द्यावे. ‘पब्लिक है सब जानती हैं,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

  • काँग्रेस नेते राहुल गांधी हे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आले आहेत. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातही सावरकर यांचा अपमान करण्यात आला आहे. त्याविरोधात ठाकरे शिवसेना ब्र देखील काढायला तयार नाही.महाविकास आघाडीत एकत्र असताना सत्तेसाठी ठाकरे शिवसेना सावरकरांचा अपमान सहन करत राहिली आणि आताही तेच करत आहे. आम्ही मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. त्यामुळे लोकांनी त्यांना नाकारले आणि आम्हाला स्वीकारले आहे, असा पलटवारदेखील एकनाथ शिंदे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT