मुंबईत होन विविध घटनेत मुलींवर लैगिंक अत्याचाक Pudhari File photo
मुंबई

मुंबई : दोन विविध घटनेत अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार

कांदिवली आणि कुर्ला येथे अत्याचाराच्या घटना

पुढारी वृत्तसेवा

कांदिवली आणि कुर्ला येथील दोन विविध घटनेत दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनोबा भावे नगर आणि चारकोप पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांतील आरोपीला पोलिसांनी अटक केली तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

कांदिवली येथे तक्रारदार महिला तिच्या चौदा वर्षांच्या भाचीसोबत रहाते. आरोपी हा याच परिसरातील असून ते एकमेकांच्या परिचित आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत आरोपीने या पिडीत मुलीला खाऊ देण्याचा बहाणा करुन तसेच तांदळाच्या पेजमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. ही मुलगी सध्या सात ते आठ महिन्यांची गरोदर आहे. हा प्रकार मुलीकडून तक्रारदार महिलेला समजताच तिने चारकोप पोलिसांत ५० वर्षांच्या आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.

दुसऱ्या घटनेत विनोबा भावे नगर पोलिसांनी एका २२ वर्षांच्या तरुणाला अटक केली. या तरुणाने पिडीत पंधरा वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. ही मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्या आईने याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT