शिळफाटा येथील महिलेवर सामुहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार

विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
Shilfata Rape And Killed News
शिळफाटा येथील घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणारPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई: पुढारी वृतसेवा

शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीतज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.27) ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या.

Shilfata Rape And Killed News
Thane News : मंदिरातील सेवेकर्‍यांकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या

घरगुती वाद झाल्याने रागाच्या भरात घरातून निघून मंदिरात रात्री थांबलेल्या (30 वर्षीय) विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिघा नराधमांना डायघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. ही घटना 9 जुलै 2024 दिवशी घडली होती. या घटनेची दखल घेत याचा तपास फास्टट्रक कोर्टात चालवण्यात यावा अशा सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

Shilfata Rape And Killed News
ठाणे : विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या; तिघांना अटक

महिलेवर सामूहिक अत्याचार आणि तिची हत्या करणाऱ्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news