Santacruz BMC land Pudhari
मुंबई

Santacruz BMC land: महापालिकेच्या भूखंडावरील बनावट ‘झोपु’चा प्रयत्न अयशस्वी

सांताक्रूझ येथे संक्रमण सदनिका लवकरच रिक्त; भूखंडाचे महानगरपालिकेला होणार हस्तांतरण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सांताक्रूझ पश्चिममधील सबवेे जवळ असलेल्या पालिकेच्या एक एकर भूखंडावर बोगस झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा प्रयत्न नगरसेविकेमुळे अयशस्वी झाला. या भूखंडावरील संक्रमण सदनिका रिक्त करून मोकळा भूखंड महापालिकेला हस्तांतरित केला जाणार आहे.

सांताक्रूझ पश्चिममधील दौलतनगर परिसरात बेस्ट बस आगाराचा काही भाग तसेच विकास रस्त्यासाठी राखीव असलेल्या भूखंडावर झोपड्यांचे अतिक्रमण झाले होते. त्यामुळे या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यास सन २००० मध्ये मान्यता देण्यात आली होती.

या ‘झोपु’साठी सांताक्रूझ सबवे जवळील उद्यानासाठी राखीव असलेले पालिकेचे भूखंड बहाल करण्यात आले. पुनर्वसनाच्या ८ इमारतीत ९०० झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले. शेजारी एक एकर भूखंडावर १७६ झोपडवासियांसाठी तात्त्पुरते संक्रमण शिबिर बांधण्यात आले होते.

सदर भूखंड पालिकेने फक्त दोन वर्षांसाठी दिला होता. परंतु २५ वर्षांनंतरही पालिकेने ताब्यात घेतला नाही? याची चौकशी झाली नाही. नगरसेविका सुनीता मेहता यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा घोटाळा घोटाळा उघड झाला आहे.

मुंबईत क्लस्टर योजनाद्वारे सर्वच झोपडपट्यांना नोटीसा दिल्या जातात. अशाप्रकारे या भूखंडावरील झोपड्यांनासुद्धा नोटीसा दिल्या होत्या. मात्र सदर भूखंड हा मुंबई महानगरपालिकेचा आहे. तसेच यावसंक्रमण शिबिर अन्य योजनेतील झोपडीवासीयांचे असल्यामुळे या ठिकाणी ‘झोपु’ योजना होणार नाही हे दिसून आले आहे. यामुळे सध्या सदर भूखंडावर झोपु योजना राबविता येणार नाही.
- डॉ. मोहन नळदकर, उपजिल्हाधिकारी, झोपु प्राधिकरणाचे सक्षम प्राधिकारी
मूळ विकासकाने ‘झोपु’वासीयांचे पुनर्वसन करण्याऐवजी भूखंडाची विक्री केली. अन्य ‘झोपु’वासीयांच्या पुनर्वसनासाठी पालिकेने भूखंड का दिले, दोन वर्षांसाठी दिलेला भूखंड २५ वर्षांनंतरही पालिकेने ताब्यात का घेतला नाही? याची चौकशी झाली तर मोठा घोटाळा बाहेर येईल.
- सुनीता मेहता, नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT