Sanjay Shirsat On Corruption pudhari
मुंबई

Sanjay Shirsat On Corruption: १० कोटी रूपयांवरील फाईल मुख्यमंत्र्याकडे जाते... संजय शिरसाट लाचखोरीच्या आरोपावर स्पष्टच बोलले

मला ब्लॅकमेल करत असाल तर मी कुठे तरी लटवकून टाकेन.... संजय शिरसाट यांनी संजय राऊतांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची दिली धमकी

Anirudha Sankpal

Sanjay Shirsat On Corruption: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अल्पसंख्यांक मंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ट्रेनिंग सेंटरसाठी ५ कोटी रूपयांचा लाच मागितल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत लातूरच्या ज्या नरसिंग उदगीर यांच्याकडे ही लाचेची मागणी केल्याचा दावा केला जात आहे त्यांनाच उपस्थित केलं होतं.

यानंतर आता संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत. मला मंत्री होऊन दोन वर्षे झाली आहेत. माझ्याकडे आलेले २५ कोटींचे एकही प्रपोजल दाखवा असे आव्हान त्यांनी दिले.

तरी मी कुठे तरी लटकवून टाकेन

संजय शिरसाट यांनी संजय राऊत तुमच्याकडे पुरावे आहेत का मला वाटले म्हणून सहज सकाळी ट्विट केले का. लातूरच्या एखाद्या कार्यकर्त्याला तरी विचारा असं देखील वक्तव्य केलं. संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना मला ब्लॅकमेल करत असाल तर मी कुठे ना कुठे तरी लटकवून टाकीन असा सज्जड दम देखील भरला आहे.

संजय शिरसाट यांनी राज्यातून अनेक लोक कामासाठी आमच्याकडे येत असतात भेटत असतात. असले धंदे मी आयुष्यात केलेले नाहीत असा देखील दावा शिरसाट यांनी केला आहे. याचबरोबर त्यांनी १० कोटींच्या वरची फाईल ही थेट मुख्यमंत्र्याकडे जाते असा देखील दावा केला.

१० कोटींच्या वरची फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते

शिवसेना नेते आणि मंत्री शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील दोन प्रवक्त्यांमधील स्पर्धेचा देखील उल्लेख करत सुषमा अंधारे यांना क्रॉ़स करण्यासाठी संजय राऊत यांनी प्रेस घेतली का. त्या व्यक्तीला बाजूला बसवून ही प्रेस घेतली. तुम्ही भ्रष्टाचार कसा केला हे आम्हाला सांगायला लावू नका असं म्हणत शिरसाट यांनी पत्राचाळ प्रकरण उकरून काढण्याचा प्रयत्न केला.

शिरसाट यांनी मी जात-पात मानत नाही. माझ्यावर आरोप करत असाल तर पुरावे द्या. सरकारच्या पैशाची उधळपट्टी कशाला करून मला मंत्री म्हणून १० कोटींच्या वर अधिकार नाहीत. २५ कोटींच्या वरच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही लागते. यांना फक्त टक्केवारी माहिती आहे. २५ कोटी ही रक्कम काही छोटी रक्कम आहे का, माझ्याकडे ३० हजार अर्ज पेंडिंग आहेत. १ लाख ते ५ लाखापर्यंतच्या फाईल्स आहेत त्या.

शिरसाट यांनी आमच्याकडे पैसे नाहीत, याला २५ कोटी मिळत नाही म्हणून हा बदनामी करतोय असा देखील आरोप केला. तुम्ही बोगस काम करता आणि आरोप आमच्यावर करता असे देखील वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT