Sanjay Raut pudhari
मुंबई

Sanjay Raut : बकवास लेकाचे... बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडणाऱ्या नेत्यांचा राऊतांनी दोनच शब्दात घेतला समाचार

Sanjay Raut on leaders tearing Balasaheb Thackeray photo: संजय राऊत यांनी या नेत्यांना फरसं महत्व न देतात दोन शब्दात आपला भावना व्यक्त केल्या.

Anirudha Sankpal

Sanjay Raut slams leaders tearing Balasaheb Thackeray photo: पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे मात्र आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते असलेल्या संजय निरूपम तसेच शायना एनसी यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर आक्षेप घेतला. त्यावेळी या नेत्यांनी पुस्तक फाडता फाडता चक्क दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडला.

अनावधानाने का असेना पण त्यांनी थेट दिवंगत शिवसेना प्रमुखांचा फोटो फाडल्याने राज्यात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोनच शब्द मात्र...

संजय राऊत यांनी या नेत्यांना फरसं महत्व न देतात दोन शब्दात आपला भावना व्यक्त केल्या. त्यांनी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांचे ट्विट रिट्वट करत त्याला दोन शब्दांचे कॅप्शन दिले. त्यांनी बकवास लेकाचे... एवढंच म्हणत आपल्या भावना पोहचवले.

अतुल लोंढेंचे आरोप

जरी संजय राऊत यांनी दोन शब्दात विषय संपवला असला तरी काँग्रेस नेते अतुल लोंढे पाटील यांनी मात्र शिंदेंच्या नेत्यांनी बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने नाही तर मुद्दाम फाडला आहे असा आरोप केला.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'शिंदेंच्या नेत्यांनी अनावधानाने नाही जाणिवपूर्वक बाळासाहेबांचा फोटो फाडला आहे. हीच भाजप RSS च विषवल्ली बाळासाहेबांच्या खांद्यावर चढून महाराष्ट्रात सत्तेवर आली आणि संधी भेटताच बाळासाहेबांची शिवसेना फोडून ती संपवण्याचे षडयंत्र केले. गद्दारसेनेचा निषेध असो ..'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT