Sanjay Raut On Vijay Mallya: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आर्थिक फसवणुकीचा ससेमीरा सुरू झाल्यावर परदेशात पळून जाणाऱ्या विजय माल्ल्यांच्या बचावात आले आहेत. त्यांनी विजय माल्या यांचा कोणाला धोका देण्याचा उद्येश नव्हता. उद्योग फेल गेल्यानंतर त्यांना भारत सोडण्यासाठी भाग पाडलं. आपल्या बोध किर्तन पुस्तकात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक देखील केले आहे. हे पुस्तक लवकरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशित होणार आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे आता उद्योगपती विजय माल्ल्या यांच्या समर्थनात उतरले आहेत. त्यांनी आपल्या पुस्तकात ते विजय माल्ल्या यांना खूप जवळून ओळखतात. विजय माल्ल्या हे एक जिंदादील व्यक्तीमत्व होतं. ते उदार आणि अनेक नेत्यांपेक्षा जास्त देशभक्त होते. विजय माल्ल्या यांच्या आलिशान जीवनशैलीमुळे त्यांच्याबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.
विजय माल्ल्या यांना फरार किंवा भगोडा म्हणण्यावरून संजय राऊत जास्तच भडकले. ते आपल्या पुस्तकात लिहितात की ज्यावेळी किंगफिशरचे मालक माल्ल्यांचा व्यवसाय ठप्प झाला. ते कर्ज चुकवू शकले नाहीत त्यावेळी बँकांनी त्यांची साथ द्यायलया हवी होती. संजय राऊत यांच्या मते गेल्या एका दशकापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने अनेक उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहे. राऊतांच्या मते विजय माल्ल्या यांना कर्जमाफीची नाही तर दिलासा देण्याची गरज होती.
किंगफिशर एअरलाईन्सच्या बँक कर्जाच्या प्रकरणात मार्च २०१६ मध्ये विजय माल्ल्या यांना देश सोडावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये मुंबईतील एका न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं होतं.
एका लेखात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आणि अ राजकीय भाषणांमधील फरक सांगितला. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय भाषणे नीरस आणि काहीही ठोस वक्तव्य नसलेली असतात. तर अ राजकीय भाषणे मात्र ऐकण्यासारखी असतात असे मत नोंदवलं.
२०२२ मध्ये अयोध्यामधील दीपोत्सव उत्सवावेळी भगवान राम यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण संजय राऊत यांच्या मते शब्दात गुंफलेला एका भावनिक प्रकाश उत्सव होता. ते म्हणतात की भगवान राम यांचे आदर्श प्रत्येक भारतीयासाठी एक मार्गदर्शकासारखा असला पाहिजे.