ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. Pudhari
मुंबई

Sanjay Raut : "केवळ ज्ञानेश कुमार पदावरून पायउतार होणार नाहीत..." : गर्जना मोर्चावर संजय राऊत काय म्हणाले?

'एसआयआर'विरोधातील आजच्या विराट मोर्चात विरोधी पक्षांचे नेते सहभागी होणार

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Garjana Morcha : देशभरात सरकारविरोधात असंतोष खदखदतोय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आजचा मुंबईतील गर्जना मोर्चा हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने होत आहे. आता १० ऑक्टोबर २०२६ दिल्ली जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन होणार आहे. केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पदावरुन जाणार नाहीत तर पंतप्रधान आणि केवळ ज्ञानेश कुमार जाणार नाहीत तर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनाही जावे लागेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. ४) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

मोदी-शहांचे ढोंग नव्या पिढीला कळलेय

वाढत्या महागाईसह सरकारविरोधातील जनतेचा तीव्र असंतोष आता रस्त्यावर उतरू लागला आहे. 'गर्जना मोर्चा' हा मोर्चा म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधात पेटलेल्या असंतोषाची ठिणगी असून, देशातील नव्या पिढीला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ढोंग पूर्णपणे कळाले आहे, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला.

'एसआयआर'विरोधातील आजच्या विराट मोर्चात विरोधी पक्षांचे नेते सहभागी होणार

आजचा 'गर्जना मोर्चा' दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक मेट्रो सिनेमा येथून निघून मुंबई महानगरपालिकेवर धडकणार आहे. या मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि डाव्या पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील. पालिका भवनासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत होणार असून, तेथे मुंबई महापालिकेसमोर प्रमुख नेते आपली भूमिका मांडतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१० ऑक्टोबरला दिल्लीत जंतर-मंतरवर मोठे आंदोलन

"सध्या देशात तीव्र असंतोष खदखदत आहे. आजचा मोर्चा हा याच असंतोषाची ठिणगी आहे. कडक उन्हाचा त्रास लक्षात घेता मोर्चा वेळेत आटोपण्याचा आमचा प्रयत्न राहील. १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन होत आहे," असेही राऊतांनी सांगितले.

तुम्हाला हीच भाषा कळते

"आम्हाला आमच्या भाषेवरून कोणीही शिकवू नये. २०१४ पूर्वी केंद्रात विरोधी पक्षात असताना भाजपने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल कोणती भाषा वापरली होती, हे देश विसरलेला नाही. तुम्हाला हीच भाषा कळते आणि यापुढे आम्हीही याच भाषेत उत्तर देणार," असा इशाराही राऊतांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT