शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  Pudhari
मुंबई

Sanjay Raut : अमित शहांच्‍या दबावाखाली निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष ५ हजार कोटींना विकला : संजय राऊतांचा घणाघात

आयोगाने आतापर्यंत ४ पक्ष विकले आहेत; भ्रष्टाचाराला पुरावे असतात का?

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut On Election Commission : शिवसेना हा पक्ष घटना तयार करून चालवला गेला. मात्र निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली हा पक्ष ५ हजार कोटी रुपयांना विकला. त्याचे आकडे आम्ही पुढील काळात देऊ. निवडणूक आयोगाने पक्ष विकण्याच्या कामात दलालाची भूमिका बजावली. निवडणूक आयोगाने आतापर्यंत ४ पक्ष विकले आहेत, भ्रष्टाचाराला पुरावे असतात का, अशा शब्दांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठरेल मैलाचा दगड

शिवसेना पक्षाच्या घटना सादर केल्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. पक्ष घटना तयार करून चालवला गेला. मात्र निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली हा पक्ष ५ हजार कोटींना विकला. याची सविस्तर आकडेवारी आम्ही पुढील काळात देऊ. पक्ष विकला हाच पुरावा आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय देणार असलेला निकाल आगामी काळात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.देशात लोकशाही वाचवायची असेल तर सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी तटस्थपणे निर्णय घ्यावा लागेल. कारण समोरची बाजू तडजोड करणारी आहे, असा दावाही त्यांनी केला.

मोदींनंतर अमित शहा नसतील हे नक्की

अमित शहा खोटे बोलत आहेत. आगामी काळात होणाऱ्या विस्तारात अमित शाह नसतील, हे खूप धाडसाने बोलत आहे. त्यांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि याला नरेंद्र मोदींनी विरोध केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर शाह नसतील हे नक्की आहे. मोदी किती वेळ टिकतील हे माहीत नाही, असेही राऊत म्हणाले.

पुढील आंदोलन हे EVM विरोधी असेल

देशातील परीक्षा आणि शिक्षण क्षेत्राबाबत आंदोलन झालं. आता पुढील आंदोलन हे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) विरोधात असेल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी मराठी आली पाहिजे

कोणत्याही राज्यात जाता तिथली भाषा शिकली पाहिजे. दिल्लीत येऊन आम्ही हिंदीत नाही बोललो तर काय होईल, असा सवाल करत महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी मराठी आली पाहिजे, असा पुनरुच्चारही संजय राऊत यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT