Sanjay Raut Criticizes Mahayuti
मुंबई : "आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सांगतात तेव्हा ते पुन्हा एकत्र येणार का, हे बोलणं योग्य नाही. ठाकरे बंधुंची युक्ती पक्की आहे. ठाणे महापालिकेसाठी आपकी बार 75 पार हा नारा आम्ही देतो. ते म्हणतील त्याच्यापेक्षा पाच आम्ही जास्त सांगू, ठाण्यात मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार आणि जेव्हा दोन भाऊ एकत्र येणार तेव्हा आमची ताकद दिसेल, ठाकरे विरोधकांच्या उडवतील ठिकऱ्या उडवतील, अशा शब्दांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.18) महायुतीवर हल्लाबोल केला.
दीपोत्सव हे मुंबईचा आकर्षण आहे. मराठी ऐक्याचा हा उत्सव आहे. कालच वातावरण उत्साही आनंदी होत. हा आनंद असाच राहील. मराठी माणसाच्या प्रश्नासाठी राज उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळतील, असेही राऊत म्हणाले.
काँग्रेस चे अनेक नेते होते संयुक्त महाराष्ट्र लढ्यात होते. काँग्रेस राष्ट्रवादी मराठी नाहीत का?, असा सवाल करत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची वर्किंग कमिटी असते. स्वातंत्र्य चळवळीचा तो पक्ष आहे.तो अजूनही तसाचं आहे. मराठी मतदाराची पीछेहाट करण्यासाठी मतदार याद्यामध्ये भाजपने घोळ घातला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपचा रंग भ्रष्टाचारचा आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व भ्रष्ट नेते आज भाजपमध्ये आहेत. स्वतः ची पोरं जन्मला घाला. पाळणे तेवढेच आहेत पोरं वाढवतंय तुम्ही. राज ठाकरे कडे चहा प्यायला जाऊ नका आणि नाटक करू नका, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
अफगाणिस्तान पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा निर्णय प्रखर राष्ट्रवादीच घेवू शकतो. आम्हीही तेच म्हणत होतो. अफगाणिस्तान जय शाह असते तर हा निर्णय घेतला नसता, असा टोलही संजय राऊत यांनी लगावला.