Sanjay Raut Comment On Shrikant Shinde :
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांनी कोण श्रीकांत शिंदे... शिवसेनेशी त्याचा काय संबंध असं म्हणत त्यांना खासदारकीचं तिकीट कसं मिळालं याचा किस्सा सांगितला.
खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानं वादंग निर्माण झालं होता. त्यानंतर ठाण्यात आंदोलन देखील करण्यात आलं होतं. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आणि देशातील घडामोडींवर आपलं भाष्य केलं. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील तोंडसुख घेतलं.
संजय राऊत म्हणाले, 'कोण श्रीकांत शिंदे... त्यांचा शिवसेनेशी काय संबंध... उद्धव ठाकरे यांनी केलेला खासदार आहे तो. पोरगं कधी शिवसेनेत होतं का..'
राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांचं खासदारकीचं तिकीट मागण्यासाठी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्याचं सांगितले. ते म्हणले, 'त्यांचे वडील (एकनाथ शिंदे) उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आणि म्हणाले माझ्या पोराकडं सध्या काय काम नाहीये. तो हाडाचा डॉक्टर आहे. त्यानंतर गोपाळ लांडगेचं तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लावलं.'
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेबद्दल देखील मोठी वक्तव्य केली. ते म्हणाले, 'आज एकनाथ शिंदे जे आहेत ते राजन विचारेंचा ज्यागामुळं आहेत. राजन विचारे यांनी त्याग केला त्यामुळं आज एकनाथ शिंदे इथं आहेत. आज जे ज्या शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहेत त्यांनी रोज सकाळी राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्राशन केलं पाहिजे.'
संजय राऊत यांनी आनंद दिघेंच्या बाबत देखील स्पष्टीकरण दिलं. 'हे काय आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगतात. काल जी लफंगी पोरं रस्त्यावर उतरली होती त्यांना काय माहिती आनंद दिघे... त्यांना राजन विचारे, सतीश प्रधान, मोदा जोशी काय माहिती असणार. काल जी उतरली होती ती बहुसंख्य ठेकेदारांची पोरं होती. लाभार्थी होती.' यानंतर राऊत पुन्हा श्रीकांत शिंदेंवर घसरले. त्यांनी या पोराला उद्धव ठाकरेंनी दोनदा खासदार केलं. त्यात त्याचं काय कर्तुत्व आहे. माझ्या नादाला लागू नका परत सांगतोय. माझी निष्ठा ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिली आहे.'
राऊत पुढे म्हणाले, जर कोणी निष्ठावंत येऊन त्यांनी जर माझ्यासमोर काय वक्तव्य केलं तरी नक्कीच मान्य करेल, पण ज्यांनी पक्षाशी आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली त्यांनी हे धदे करूच नयेत. मला शिव्या देण्यासाठी कालच्या आंदलोनाला त्यांनी पाच लाख खर्च केले असतील. हे सर्व पेड आहे.