Sanjay Raut On CJI Gavai :
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना बुट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापर्यंत सर्वांनी याचा निषेध केला. या घटनेवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत मुंबई बोलताना म्हणाले, 'हा शूज मुध्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर फेकण्यात आलेला नाही किंवा तसा प्रयत्न करण्यात आलेला नाही तर हा शूज भारताच्या संविधानावर फेकण्यात आला आहे. सत्तेत अशी लोकं आहेत जी संविधान माणण्यास तयार नाहीत. अशा प्रकारची कृत्य करणारे हे त्यांचेच चेल चपाटे आहेत.'
संजय राऊत यांनी एएनआयशी बोलताना बिहारमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, 'निवडणूक आयोगानं काल बिहारमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ही निवडणूक खूप रंजक होणार आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढली. त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजप यांना निष्पक्ष निवडणुकांच्या मुद्यावर उघडं पाडलं.'
राऊत पुढं म्हणाले, 'त्यांनी जा प्रकारे मतदार अॅड केले आणि त्यांना भाजपचं मतदार केलं. एका घरात शंभर शंभर मतदार घुशवून भाजपचा वोटर बनवलं आहे. हे सर्व लोकांच्या समोर आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही लोकशाही आहे. आता मोदीजी येतील.. मोदीजींनी ७५ लाख महिलांचे मत खरेदी करण्याचा प्रयत्न निवडणुकीपूर्वी केला. १० हजार महिलांच्या खात्यात टाकले गेले. जसं महाराष्ट्रात लाकडी बहीण योजनेत केलं. हे कधीपर्यंत सुरू राहणार... तुम्ही एका देशाचे पंतप्रधान आहात तुम्ही एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात हे तुम्हाला समजलं पाहिजे मात्र याचा निर्णय निवडणुकीत होऊन जाईल.'