Sanjay Raut Gov. Fall Claim pudhari
मुंबई

Sanjay Raut Gov. Fall Claim: सप्टेंबर नंतर सरकारच्या पडझडीला सुरूवात.. संजय राऊतांचा मोठा दावा, वंदे मातरम् वरूनही हाणला टोला

Anirudha Sankpal

Sanjay Raut Government Fall Claim: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा आणि खळबळजनक दावा केला. त्यांनी सप्टेंबर महिन्यापासून सरकारची पडझड होण्यास सुरूवात होईल असं सांगितलं. तसेच काल (दि. २१ ऑगस्ट) पुण्यातील सीओईपी हॉस्टेवर झालेल्या राड्यावरून देखील अभाविप ला टोला लगावला. त्यांनी वंदे मातरम् वरून केंद्र सरकारला देखील चिमटे काढले.

भाजपच्या यंत्रणेच्या पायाखालची वाळू सकरली

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अभाविप गुंडगिरी करत होती अन् काँग्रेसवर गुन्हा दाखल झाला आहे. मोदी, शहा अभाविप राहुल गांधींना मानत नसेल तरी भविष्यात त्यांना विरोधात बसावे लागणार आहे.

पुणे पोलिसांनी राहुल गांधाच्या कार्यक्रमासाठी ३० अटी टाकल्या आहेत. ते काही परदेशातून आले आहेत का, अन्य नेत्यांना अशा अटी पोलीस आयुक्त टाकतात का? याचे कारण एकच आहे की देशातील भाजप यंत्रणा आणि सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.

संजय राऊत यांचा मोठा दावा

संजय राऊत यांनी बोलता बोलता एक मोठा दावा केला. त्यांनी सप्टेंबरनंतर सरकारची उतरती कळा सुरू होईल. मोदी शहांचे चेहरे बघा काल दिल्लीत राहुल गांधींसमोर सरकार झुकले. भाजपचे पुण्यात हे सुरू आहे. युवा की आवाज म्हणजे बेरोजगारी असा दावा देखील संजय राऊत यांनी केला.

वंदे मातरम् वरून देखील संजय राऊत यांनी टोलेबाजी केली. त्यांनी ज्यांतचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरम् वरून उठाठेव करू नये. यांनी कधी वंदे मातरम् गर्जना केली नाही. आता नसती उठाठेव केली जात आहे. वंदे मातरम् ला कोणाचाही विरोध नाहीये.

जंतर मंतरवर मुली वंदे मातरम् म्हणत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आता हे पुण्यात वंदे मातरम् म्हणत आहेत. याचे कोणी वंदे मातरम् म्हणत फासावर गेलं आहे का?

रोहित पवारांच्या बॅनरवरूनही टिप्पणी

संजय राऊत यांनी रोहित पवार यांनी बॅनर लावले आहे याबाबत बोलतातना रोहित पवार यांनी जरी बॅनर लावले असले तरी राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत. मी आधीच म्हटले होते की राहुल गांधी आणि रोहित पवार यांची जवळीक वाढली हे चांगले आहे.

भाजप हा डरपोक पक्ष असून आता सत्तेतून गेली तर वर्षभर घरातून बाहेर येणार नाहीत. राहुल गांधी यांचा कार्यक्रम जर कोणी उधळवून लावणार अशी भाषा करत असेल तर तो दहशतवाद असून पोलिसांनी गुन्हे दाखल करायला हवेत. नारीशक्ती जमते तर तुम्ही कार्यक्रम उधळवून लावण्याचा प्रयत्न करता. माझ्या भाषेत याला गां**गिरी म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT