Marathwada Rain, Sanjay Raut Attacks State Govt : मराठवाडा प्रदेशात पावसाने थैमान घातले असतानाही सरकारचे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२८) सरकारवर जोरदार टीका केली. मराठवाडा पावसाने उद्ध्वस्त झाला आहे. याकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. सरकार भारत आणि पाकिस्तान सामन्याला संरक्षण देत आहे मात्र शेतकर्याला संरक्षण नाही. संपूर्ण मंत्रीमंडळ कामचुकार आहे. सरकारची मदत कुणालाही पोहोचेले नाही. सरकार तुमचं आहे. तुम्ही आम्हाला कसले प्रश्न विचारताय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी केला.
एकीकडे मराठवाडा पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई आणि नागपूरमध्य काय करत आहेत? राज्यातील पूर परिस्थिती बघून सरकारनं २४ तास काम करायला हवे, लोकांना अनेक दिवस अन्न-पाणी मिळत नाहिये. मंत्री, पालकमंत्री कुठे आहेत? पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात ठाण मांडून बसल पाहिजे; पण राज्य मंत्रीमंडळच कामचुकार आहे. संपूर्ण मंत्रीमंडळाने लातूर, नांदेडला जायला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठवाड्याचा दौरा करावा, असे आवाहन करत राज्य सरकारची मदत कुणालाही पोहोचली नाही, असा आरोपही संजय राउत यांनी केला.
भारत-पाक सामना बघनाऱ्यांचा डीएनए चेक करावा लागेल. महाराष्ट्रात पावसाचे थैमान सुरू असताना, सरकार क्रिकेटच्या बंदोबस्तात व्यस्त आहे. आजच्या सामन्यावर ४ ते ५ कोटी रुपयांचा सट्टा लावला जाईल. सट्टा लावणारे सर्वजण गुजरातचे आहेत," असा आरोप करत अशा देशद्रोही वृत्तीला सरकार पाठिंबा देत असल्याचे गंभीर आरोपही राऊत यांनी केला.