Sanjay Raut pudhari photo
मुंबई

Sanjay Raut: शौचालय घोटाळा आरोप प्रकरणी संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्यांना मोठा धक्का

Anirudha Sankpal

Sanjay Raut Acquitted Toilet Scam Defamation Case: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शौचालय घोटाळा आरोप प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांनी बरेच आरोप केले होते. या विरोधात किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी अनेक दिवसांपासून सुनावणी रखडलेली होती. अखेर आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यात संजय राऊत यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं.

काय होतं प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरूद्ध माजगाव न्यायालयात मानहानीचा गुन्हा दाखल केला गेला होता. त्या न्यायालयाच्या निकालाविरूद्ध संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात याचिका केली होती. त्या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. त्यात संजय राऊत यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचे आरोप केले होते. या आरोपांनंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता.

निर्णय पलटला

या प्रकरणी खालच्या माजगाव कोर्टात सुनावणी होऊन संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयानं संजय राऊत यांना १५ दिवसाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर संजय राऊत यांना दंड देखील ठोठावण्यात आला होता.

या निकालाविरूद्ध संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सत्र न्यायालयानं संजय राऊत यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. आता आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT