राष्ट्रीय उद्यानातील मिनी ट्रेन धावणार कधी? pudhari photo
मुंबई

SGNP Train: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी ट्रेन बंद; वन विभाग प्रशासनाकडून तांत्रिक कारण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी ट्रेन बंद; वन विभाग प्रशासनाकडून तांत्रिक कारण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांसाठी आकर्षण असलेली वनराणी (मिनी ट्रेन) चा १४ मार्च २०२६ रोजी मोठा गाजावाजा करून लोकार्पण केला. मात्र अवघ्या १२ दिवसांतचं तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली आहे. यामुळे पर्यंटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे ५ वर्ष बंद असलेली वनराणीला उत्तर मुंबईचे खासदार तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पुढाकार घेवून अत्याधुनिक अशी ट्रेन बनविण्याची संकल्पना आखली होती. त्यानुसारर ती प्रत्यक्षात पुर्ण करून पर्यटकांसाठी १४ मार्च २०२६ रोजी खुली करण्यात आली होती. मात्र सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी मिनी ट्रेनच्या नियमित सफारीदरम्यान ट्रेनच्या ट्रॅकच्या अनुषंगाने काही तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी

कृष्णगिरी उपवन, यांनी RITES Limited यांचे वरिष्ठ अभियंता बिसेन व मे. खोडाल कॉर्पोरेशन, अहमदाबाद यांचे संबंधित कर्मचारी एन. पटेल यांना याबाबत भ्रमणध्वनी वरून कळविले व याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना दिल्याची माहिती वन विभाग प्रशासनाकडून देण्यात आली.

सदर वनराणी, टॉय ट्रेन ही गुजरातून काही महिन्यांपूर्वी आलेली ही नवीन ट्रेन आहे. ती बंद झाल्यामुळे पर्यटकांमध्ये प्रशासना विरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. गुजरात अहमदाबाद मधून ही हिरव्या रंगाची नवीन ट्रेन मागवण्यात आली होती, नवीन ट्रेन बंद पडल्यामुळे ट्रेन बनवणाऱ्या कंपनीचा कामावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण केली जात आहे.

सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोन्हीही ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल करण्याच्या अनुषंगाने या कार्यालयाकडून नियमित पाठपुरावा केला जात आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी उद्भवू नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित यंत्रणांसोबत शनिवार, २८ मार्च रोजी वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत ही दुरुस्ती व सुधारणा कामे हाती :- 

१) मिनी ट्रेनच्या इंजिनची क्षमता अपुरी पडत असल्याने अतिरीक्त २ पॉवर मोटर्स बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे ट्रेनची वाहन क्षमता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

२) संपूर्ण ट्रॅकचे तांत्रिक परीक्षण करून आवश्यक त्या दुरुस्त्या व समतलीकरण करण्यात आलेले आहे जेणेकरून ट्रेनची गती सुरळीत राहील.

३) यांत्रिक भागांची तपासणी करून आवश्यक त्या भागांची दुरुस्ती / बदल करण्यात येत आहे.

४) नियमित देखभाल व निरीक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा सक्षम करण्याबाबतही कंपनीस सूचित करण्यात आले आहे. अशी माहिती वन विभाग प्रशासनाकडून सांगण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT