मुंबई

Sandip Deshpande : आमची भूमिका इतर कोणी मांडू नये : संदीप देशपांडेंनी राऊतांना सुनावले

मंगळवारी निवडणूक आयोगाला भेटणाऱ्या शिष्टमंडळाचा महाविकास आघाडीसोबत संबंध नाही

पुढारी वृत्तसेवा

Sandip Deshpande On Sanjay Raut Statement : "आमच्या पक्षाची भूमिका हे राज ठाकरे ठरवतात आणि तेच ती भूमिका बोलतात. त्यामुळे आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरेच ठरवतात आणि तेच बोलतील. इतर कोणीही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार नाही. अजून किती स्पष्ट बोलायचं?", अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुनावले. राज ठाकरे यांना काँग्रेससोबत युती हवी आहे, असं विधान शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १३) सकाळी केले होते

आम्ही हर्षवर्धन सपकाळांकडे कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही

"आम्ही कोणताही प्रस्ताव हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवलेला नाही. त्यामुळे त्यावर बोलण्याचं कारणच नाही. छटपूजेला आमचा विरोध नव्हता; पण त्यातून कोणी राजकीय ताकद दाखवत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही," असंही देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.

निवडणूक आयोगाला भेटणाऱ्या शिष्टमंडळाचा मविआसोबत संबंध नाही

"लोकशाहीत निवडणूक पारदर्शक व्हावी, असं केवळ विरोधकांनाच नाही, तर सत्ताधाऱ्यांनाही वाटायला हवं. यंत्रणा चांगली असावी, ही केवळ महाविकास आघाडी किंवा विरोधकांची जबाबदारी नाही.या मोहिमेत सत्ताधारी पक्षांनीही सहभागी व्हावं. उद्या निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ जाणार आहे, त्याचा महाविकास आघाडीसोबत काहीही संबंध नाही.आम्ही सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. उद्या कळेल की कोण येतं. आम्ही सर्वांना निमंत्रण पाठवलं आहे," असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही युती झाली म्हटलं तरी आमचा आक्षेप नाही : नांदगावकर

"मतचोरी प्रकरणातील आरोपांवरून लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, यासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही आम्ही लेखी निवेदन दिलं आहे.सगळ्यांनी सांगितलं आहे की 'आम्ही येतोय'. याबाबत भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अजून कळवलं नाही.आता ज्याला जो अर्थ काढायचा आहे, तो काढा. तुम्ही म्हणाल की युती झाली, तरी आमचा काही आक्षेप नाही," असं मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT