Operation Tiger Pudhari
मुंबई

Operation Tiger: शिंदेंच्या बैठकीला ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांची हजेरी

एकनाथ शिंदेंच्या नगराध्यक्षांच्या बैठकीला संदेश पारकर यांची उपस्थिती; उदय सामंतांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवसेना नगराध्यक्षांच्या बोलावलेल्या बैठकीला ठाकरे गटाचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हजेरी लावली. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’चे संकेत दिल्याचे संदेश पारकर उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक घेतली. या बैठकीला संदेश पारकर हे उपस्थित होते.

एवढेच नव्हे तर सुरुवातीला त्यांनी भाषणही केले. ही बैठक झाल्यानंतर पारकर यांनी गुपचूप काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतर पारकर उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे सेनेच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे स्पष्ट संकेत उदय सामंत यांनी दिले.

संदेश पारकर हे बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी भाषणही केले याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, ‘ऑपरेशन टायगर’बाबत सध्या आम्ही बोलणार नाही, दुष्काळामुळे सध्या त्यावर भाष्य टाळत आहोत, असेही सामंत म्हणाले.

एकनाथ शिंदे ऑपरेशन कधी करतात, हे कोणालाही कळत नाही. खासदार ओमराजे निंबाळकर माझ्या बाजूला आहेत. त्यांचे ऑपरेशन कधी झाले, हे देखील कोणाला कळले नाही, असे म्हणत ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशाची उदय सामंत यांनी यावेळी आठवण करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT