Sachin Waze Disha Salian Case pudhari
मुंबई

Sachin Waze Disha Salian Case: ..तर माझे म्हणणे ऐकून घ्यावे; सचिन वाझेंची दिशा सालियान प्रकरणात एन्ट्री; NIA कोर्टाकडे अर्ज

सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टाकडे स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज दिला आहे. त्यांनी जाणीवपूर्वक बदनामीची मोहीम सुरू असल्याचा दावा केला.

Anirudha Sankpal

Sachin Waze Disha Salian Case: राज्यातील अनेक बड्या हस्तींची नावे आलेल्या दिशा सालियान प्रकरणात एक महत्वाची अपडेट आली आहे. दिशा सालियान प्रकरणावरून सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टाकडे अर्ज केला आहे. दिशा सालियान प्रकरणात सचिन वाझे यांची पहिल्यांदाच भूमिका समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे.

बदनामीची मोहीम

सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टाकडे स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज दिला आहे. त्यांनी या अर्जात दिशाच्या प्रकरणात त्यांचे नाव जाणीवपूर्वक घेऊन बदनामीची मोहीम आखली जात असल्याचा दावा केला आहे.

सतीश सालियान यांचे वकील आणि काही माध्यमांनी जाणीवपूर्वक ही बदनामी चालवली असल्याचा आरोप या अर्जात करण्यात आला आहे.

निलेश ओझाला ओळख नाही

निलेश ओझा यांनी यापूर्वी वाझेच्या लोकांनी त्यांना संपर्क केला असून त्यांच्याकडे वाझेचा दिशाच्या प्रकरणात कबुली जबाब आहे. या प्रकरणातील पुरावे त्याने नष्ट केले तसेच तो माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचा दावा केला होता.

यावर आता सचिन वाझे यांनी मी निलेश ओझा नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. मी कुठलीही माणसे त्यांच्याकडे पाठवली नाहीत असं अर्जात सांगितलं आहे.

माझे म्हणणे ऐकून घ्यावे

ते अर्जात पुढे म्हणाले की, 'हा दावा पूर्णपणे खोटा असून माझ्याबद्दल होत असलेले आरोप पूर्णपणे खोटे असून मी या प्रकरणात कुठलाही कबूलीजबाब देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

तसेच सीबीआयने या प्रकरणात जर माझे प्रोडक्शन वॉरंट मागितले तर माझे म्हणणे ऐकून घेतले जावे आणि नंतर निर्णय घ्यावा असे वाझेने कोर्टाला अर्जाद्वारे कळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT