Sabudana Demand Pudhari
मुंबई

Sabudana Demand: आषाढी एकादशीला राज्यात ८०० टन साबुदाण्याची विक्री

साबुदाण्याचे दर १५ टक्क्यांनी वाढले, किरकोळ बाजारात साबुदाणा १००, भगर २४० रुपये किलो

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र पाटील

नवी मुंबई: राज्यात शनिवारी आषाढी एकादशी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या दिवशी अनेक जण उपवास करीत असल्याने दर वर्षी साबुदाणा आणि भगर या पदार्थांना मोठी मागणी असते.

भगर, साबुदाणाच्या दरात १५ टक्के दरवाढ झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात गेल्या आठ दिवसात १५ दिवसांत राज्यात ७५० ते ८०० टन तर मुंबईसह उपनगरात २०० टन साबुदाण्याची व्रिकी झाल्याची माहिती घाऊक व्यापारी राजूभाई चोप्रा यांनी दिली.

सध्या एपीएमसीत ६० ते ६५ रुपये किलो साबुदाणा असून किरकोळला १०० ते १०५ रुपये किलो दर आहे. तर भगर १५० रुपये किलो घाऊकला तर किरकोळला २४० रुपये किलोचा दर आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत आता दक्षिण भारतातरुन साबुदाण्याची थेट आवक केली जाते.

मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड आणि विर्दभातही थेट स्थानिक बाजारातील व्यापारी तामिळनाडू येथील सेलम येथुन साबुदाणा मागवतात. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून तामिळनाडू सेलम येथुन ही आवक संबंधित जिल्ह्यात चालू होते.

त्याचा फटका मुंबई एपीएमसीला बसला आहे. एपीएमसीत नियमित विक्री होणार पांढरा गुलाब जातीच्या साबुदाण्याला मोठी मागणी आहे. जून महिन्यात ५५ रुपये किलो हा साबुदाणा एपीएमसीत घाऊक बाजारातील किलोचा दर होता. हाच साबुदाणा किरकोळ बाजारात १०० ते १०५ रुपये किलो आहे.

साबुदाण्याची आवक ही तामिळनाडू येथील सेलम येथुन होते. त्यामध्ये डॉल्फिन, नॉयलॉन, मोती, गुलाब, पांढरा गुलाब या प्रकारच्या साबुदाणा तयार केला जातो. सर्वाधिक मागणी ही पांढरा गुलाब साबुदाण्याला आहे.

एपीएमसीत भगरीलाही मोठ्या प्रमाणावर उठाव आहे. घाऊकला भगर १५० ते १६५ रुपये किलो तर किरकोळला २४० रुपये किलो दराने व्रिकी केली जाते. घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात भगर ९५ रुपये किलो अधिक दराने विकली जात आहे. भगरची आवक नाशिक, घोटी आणि शहापूर या तालुक्यातुन एपीएमसीत होते.

श्रावणापर्यंत दरवाढ कायम राहणार

आषाढी एकादशीला साबुदाणा एपीएमसीत ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात किलोमागे ३५ ते ४० रुपयांची दरवाढ झाल्याचे दिसून आले. श्रावण महिन्यांत आणखी दरवाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

एपीएमसी गेल्या आठवड्यापासून साबुदाण्याला उठाव चांगला असून दररोज २५ ते ३० टन म्हणजे सुमारे ४५० गोणी (५० किलो) विक्री होते. श्रावणापर्यंत ही दरवाढ कायम राहील, अशी माहिती घाऊक व्यापारी राजूभाई चोप्रा यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT