एक्झिट पोलनुसार डॉ. स्मिता जाधव बाजी मारणार? 
मुंबई

Graduate & Teachers Constituency Election | महायुतीची सरशी होणार

एक्झिट पोलनुसार डॉ. स्मिता जाधव बाजी मारणार?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील पाच जागांच्या निवडणुकीचा अंदाज ‘साम टीव्ही’च्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यानुसार पाचपैकी महायुतीला चार जागांवर विजयाची शक्यता असून यात भाजपला दोन, शिवसेना (शिंदे गट) एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.

एक्झिट पोलमध्‍ये भाजपचे पारडे जड असल्याचे समोर आले आहे. ‘पुणे पदवीधर’मध्‍ये भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख यांच्यात थेट लढत झाली. एक्झिट पोलमध्‍ये डॉ. स्मिता जाधव या संभाव्य आमदार ठरण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीला धक्का बसण्याची शक्यता असून, एक्झिट पोलने काँग्रेसच्या आदिती पोहरे या संभाव्य आमदार ठरण्याचा अंदाज वर्तवला आहे. महायुतीत या जागेवर शिवसेनेकडून (शिंदे गट) किरण सरनाईक उमेदवार होते; मात्र भाजप व शिंदे सेनेतील बंडखोरीमुळे सरनाईक यांच्यासमोर चार बंडखोरांचे कडवे आव्हान उभे राहिले. पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत सचिन सानप विजयाचे दावेदार मानले जात आहेत. तर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण पकड कायम ठेवत पुन्हा बाजी मारण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT