Bribe Case Pudhari
मुंबई

RTO Bribery Case: लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजेंद्र बिंदला आणि नंतर मुस्तफा सेलोट याला अटक केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: लायसन्स नूतनीकरणासाठी लाच मागणार्‍या मुस्तफा नूरमोहम्मद सेलोट आणि राजेंद्र प्रसाद बिंद या दोन आरटीओ एजंटना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली.

यातील तक्रारदाराचे ड्रायव्हिंग लायसन्स अंधेरीतील प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त करुन ब्लॉक केले होते. याच संदर्भात त्यांची मुस्तफा सेलोटशी ओळख झाली होती. त्याने त्यांना लायसन्स नूतनीकरण करुन देतो असे सांगून त्यांच्याकडे साडेपाच हजारांची लाचेची मागणी केली होती.

यावेळी त्यांनी त्याला चार हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यांनी मुस्तफाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. यावेळी मुस्ताफ सेलोटने तक्रारदाराकडे चार हजारांची लाचेची मागणी करुन साडेतीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते. तसेच त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे काम करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते.

ठरल्याप्रमाणे सोमवारी तक्रारदार साडेतीन हजारांची लाचेची रक्कम घेऊन गेले होते. यावेळी मुस्तफाने ती रक्कम त्याचा दुसरा आरटीओ सहकारी राजेंद्र बिंद याला देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ती रक्कम राजेंद्र बिंदला दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजेंद्र बिंदला आणि नंतर मुस्तफा सेलोट याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT