आरटीई निवड झालेल्यापैकी 33 हजार बालके प्रवेशापासून दूर pudhari photo
मुंबई

RTE admission issue : आरटीई निवड झालेल्यापैकी 33 हजार बालके प्रवेशापासून दूर

पुन्हा एकदा 8 मे पर्यंत मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यात राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या 1 लाख 5 हजार 811 विद्यार्थ्यांपैकी केवळ 72 हजार 284 बालकांचे प्रवेश निश्चित केले आहेत.अजूनही तब्बल 33 हजारांहून अधिक बालक प्रवेशापासून दूर आहेत. यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ 8 मे पर्यंत देण्यात आली आहे.

राज्यात एकूण 1 लाख 14 हजार 826 आरटीई जागांसाठी 2 लाख 89 हजार 286 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून 1 लाख 5 हजार 811 विद्यार्थ्यांची निवड झाली; मात्र अंतिम टप्प्यात मोठ्या प्रमाणात पालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही परिणामी सुमारे 30 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाबाहेर राहिले आहेत.

मुंबईत 4 हजार 941 निवडीतून 1 हजार 647 बालकांचे प्रवेश झालेले नाहीत तर ठाण्यात 10 हजार 578 निवड झाली असतानाही 3 हजार 446 विद्यार्थी अजूनही प्रवेशाबाहेर आहेत. रायगडमध्ये 4 हजार 345 पैकी 1 हजार 364 आणि पालघरमध्ये 3 हजार 183 पैकी 767 बालकांनी प्रवेश घेतलेला नाही.

पुण्यात 17 हजार 728 निवडीतून 12 हजार 502 प्रवेश झाले, नागपुरात 6 हजार 992 पैकी 4 हजार 244, तर ठाण्यात 10 हजार 578 पैकी 7 हजार 132 आणि मुंबईत 4 हजार 941 निवडीतून केवळ 3 हजार 294 प्रवेश झाले. ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्याने ही प्रक्रिया अपेक्षित यश मिळवू शकली नसल्याचे चित्र आहे.

  • पालकांकडून कागदपत्रांची पूर्तता वेळेत न होणे, अलॉटमेंट लेटर काढण्यात आलेल्या अडचणी, तसेच पडताळणी प्रक्रियेत झालेला विलंब ही प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. यामुळे आणखी मुदतवाढ देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT