Rohit Pawar Postpone Press Conference pudhari photo
मुंबई

Rohit Pawar Postpone Press Conference: माझ्या काही महत्वाच्या बैठका सुरू आहेत... रोहित पवारांनी 'ती' पत्रकार परिषद पुढे ढकलली

रोहित पवार यांनी त्यांचे काका अजित पवार यांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वादळी प्रेझेंटेशन सादर केलं होतं.

Anirudha Sankpal

Rohit Pawar Press Conference: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचे काका अजित पवार यांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वादळी प्रेझेंटेशन सादर केलं होतं.

त्यानंतर आज (दि १२ जानेवारी) ते दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार होते. ही पत्रकार परिषद देखील गौप्यस्फोटांनी आणि महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारी ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र पत्रकार परिषदेच्या काही तास आधाच ती पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. ही माहिती त्यांनी ट्विट करून दिली.

काय म्हणाले रोहित पवार

अजित पवार यांचा विमान अपघात होता की घातपात असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या रोहित पवार यांची आजची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून याची माहिती दिली.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'आज अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय हा आमच्यासाठी महत्त्वाचा असून तो योग्य दिशेने जाण्यासाठी माझ्या काही बैठका सुरु आहेत. त्यामुळं १२ फेब्रुवारी रोजी राजकीय विषयावर घेण्यात येणारी पत्रकार परिषद पुढे ढकलावी लागतेय... अजितदादांच्या चौकशीचा विषय मार्गी लागताच लवकरच राजकीय विषयावरील पत्रकार परिषदही घेण्यात येईल आणि याबाबत दोन दिवस आधी कळवण्यात येईल.'

दरम्यान, रोहित पवार यांनी मुंबईत विमान अपघाताबाबतचे तांत्रिक प्रेझेंटेशन केल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. त्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. तत्पूर्वी काल म्हणजे ११ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित शहा यांनी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबीयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, आज रोहित पवार हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच इकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाटाचे सुनिल तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत पुन्हा एकदा काही प्रश्न विचारले होते. यावरून अजित पवार गटाचा विलिनीकरणाला विरोध असल्याने तूर्तास तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नसल्याचं सूत्रांकडून समजतं.

सुनिल तटकरे म्हणाले की, कोणत्या राष्ट्रवादीचे कोणत्या राष्ट्रवादीत विलिनीकरण करायचं. शरद पवार गट एनडीएसोबत येणार का असे प्रश्न विचारले. याबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी बोललो असल्याचं देखील सुनिल तटकरे यांनी सांगितलं. त्यांनी आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हालाच आहे असं देखील त्यांनी सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT