Riya Yadav  pudhari photo
मुंबई

Riya Yadav Cyber Complaint: आंदोलनादरम्यानची व्हायरल मॉडेल रियाची सायबर सेलकडे धाव; ऑनलाइन ट्रोलिंग, धमक्या आणि बदनामीविरोधात तक्रार

रिया अहिरचा पोलिसांच्या वाहनासमोर उभा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दादर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहिल्यामुळे चर्चेत आलेली मॉडेल रिया यादव हिने आता महाराष्ट्र सायबर सेलकडे ऑनलाइन छळ, ट्रोलिंग, बदनामी आणि धमक्यांबाबत तक्रार दाखल केली आहे.

तिच्या तक्रारीवर प्राथमिक पडताळणी सुरू असून, त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रिया अहिरचा पोलिसांच्या वाहनासमोर उभा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

त्यानंतर तिच्याविरोधात अपमानास्पद पोस्ट, महिलांचा अवमान करणाऱ्या टिप्पणी, बदनामीकारक मजकूर आणि मॉर्फ केलेले फोटो प्रसारित करण्याच्या धमक्या मिळाल्याचा आरोप तिने केला आहे. त्यामुळे संबंधित सोशल मीडिया खात्यांवर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे.

रियाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सततच्या ऑनलाइन छळामुळे मानसिक त्रास होत असून महिलांना लक्ष्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या ट्रोलिंगमुळे इतर महिलाही सार्वजनिक प्रश्नांवर बोलण्यास घाबरतात, असेही तिने नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT