Mumbai Crime Pudhari
मुंबई

Mumbai Crime: पत्नीशी संबंध ठेवणाऱ्या प्रियकराची दगडाने ठेचून हत्या

सदर घटना 27 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास रे रोड रेल्वे स्थानकाजवळ घडली. याच परिसरात तक्रारदार 26 वर्षांची महिला राहते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पत्नीशी संबंध ठेवणाऱ्या प्रियकराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना रे रोड परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी पती इदू शेख याला वडाळा पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर अन्सार रसुल शेख याची हत्या केल्याचा आरोप असून स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर घटना 27 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास रे रोड रेल्वे स्थानकाजवळ घडली. याच परिसरात तक्रारदार 26 वर्षांची महिला राहते. आरोपी इदू हा तिचा पती असून तो काहीच कामधंदा करत नाही. त्यातच त्याला नशा आणि दारु पिण्याचे व्यसन होते.

त्यातून पती-पत्नीमध्ये नेहमी खटके उडत होते. त्यामुळे ती त्याला सोडून गेली होती. गेल्या काही महिन्यांपासून ती अन्सारसोबत रे रोड परिसरातच राहत होती. अन्सार हा बीपीटीमध्ये मजुरीचे काम करत होता. या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. ही माहिती इदूला समजताच तो त्यांना जाब विचारण्यासाठी बुधवारी रात्री गेला.

यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली व त्याने अन्सारला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नंतर त्याच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. यात अन्सार हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती प्राप्त होताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT