Ravindra Dhangekar On Navnath ban Doreamon:
पुण्यातील जैन ट्रस्टच्या जमिनीचा वाद हा राष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहळ यांना चांगलेच धारेवर धरले आहे. दरम्यान, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका केली होती. त्याला रविंद्र धंगेकरांनी थोडक्यात पण अत्यंत मिश्किल प्रतिक्रिया दिली.
त्यांनी भाजप प्रवक्त्याला डोरेमॉन म्हणत चिमटा काढला. मात्र त्यावर प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील प्रत्युत्तर देत फूलिश नोबिता म्हणत सोशल मीडियावर राजकीय नेत्यांचा 'पोरखेळ' कसा असतो याची प्रचिती आणून दिली.
पुण्यातील जैन ट्रस्टच्या जमिनीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. रविंद्र धंगेकर हे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर धंगेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील जैन ट्रस्ट जमीन वाद प्रकरणी टिप्पणी केली होती.
त्यानंतर भाजपचे राज्यातील प्रवक्ते नवनाथ बन यांनी धंगेकर यांच्यावर टीका करत, 'धंगेकरांची अमित शहा यांच्यावर बोलण्याची लायकी नाही. तुम्ही १२ पक्ष फिरून आला आहात. त्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना जॉईन केली आहे. जर तुम्ही अमित शहांना टार्गेट केलं तर तुम्हाला तसाच प्रतिसाद मिळेल.' असं वक्तव्य केलं होतं.
यावर प्रत्युत्तर म्हणून धंगेकर यांनी एक ट्विट केलं. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'बाकी सगळं ठीक आहे मला एक गोष्ट सांगा हा डोरेमॉन कोण आहे?'
याला प्रत्युत्तर देणार नाही ते नवनाथ बन कसले. त्यांनी देखील त्वरित प्रतिक्रिया दिली की, 'शिवसेनेचे वरिष्ठ नेते रविंद्रजी धंगेकर जे १२ पक्ष फिरून आले आहेत त्यांनी मला डोरेमॉन म्हटलं. ते हे विसरले की डोरेमॉन उत्तर शोधतो. लोकांना मदत करतो. कार्टून सिरीजमध्ये एक पात्र आहे नोबिता. जर तुमच्या मते मी डोरेमॉन आहे तर तुम्ही नोबिता आहात.